नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला; वाचा न्यायालयात नेमकं काय घडलं?
मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नवाब मलिकांनी दाऊदशी संबंधित व्यक्तींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता न्यायालयाकडून नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत 7 मार्चंपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
ईडीकडून पीएमएलए न्यायालयात एएसी अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला. अंडरवर्ल्ड गुंडांशी संबंधित पुरावे सापडत आहेत. या जबाबाच्या आधारे पुढील चौकशी ईडी कोठडीमध्ये होणं आवश्यक आहे, असं ईडीने न्यायालयात म्हटलं आहे. 25 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत आम्ही चौकशी करू शकलो नाही. त्यामुळे ईडीने न्यायालयाकडून आणखी वेळ मागवला आहे.
ईडीने केलेली अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा नवाब मलिकांच्या वकिलांनी केला आहे. यामुळे तातडीने सुटका करण्याची मागणी नवाब मलिकांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यातच ईडीने अधिकचा वेळ मागितल्याने नवाब मलिकांच्या कोठडीत 7 मार्चंपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, ईडीकडून नवाब मलिकांनी हसीना पारकरला 55 लाख दिल्याचा आरोप करण्यात आला होता. आता हे 55 लाख ही टायपिंग मिस्टेक असल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक हे जेलमध्ये असून तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. आरोप सिद्ध न झाल्याने नवाब मलिकांना राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे.
थोडक्यात बातम्या-
आदित्य ठाकरेंच्या एन्ट्रीची एकच चर्चा; राज्यपालांच्या अभिभाषणावर म्हणाले…
“राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचं नाव डांबराने लिहिलं जाईल”
मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
मविआच्या आमदाराचं ‘खाली डोकं वर पाय’, अभिभाषण अर्ध्यावर सोडून राज्यपाल माघारी
“अटकेत असलेला मंत्री मंत्रिपदावर कसा?, बाळासाहेब असते तर…”
Comments are closed.