बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केलीच नव्हती’; ‘या’ शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली | मागील महिन्यात केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं होतं. हे अंतर 6 ते 8 आठवड्यांवरून दुप्पट करत 12 ते 16 आठवडे निश्चित केलं होतं. देशात लशीचा तुटवडा असल्यानं दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आल्याचा दावाही अनेकांकडून करण्यात आला होता. मात्र शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा केला आहे.

कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती, असा खळबळजनक खुलासा तज्ज्ञ गटातील तीन सदस्यांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी लशीच्या दोन डोसमधील अंतर 8 ते 12 आठवड्यांपर्यत सहमती दर्शवण्यात आली होती. पण दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती. कारण 12 आठवड्यानंतर लस घेतलेल्या नागरिकांमध्ये काही संभाव्य परिणाम होऊ शकतो, असं NTAGIचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी तज्ज्ञ गटातील भारताचे वायरोलाॅजिस्ट शाहीद जमील यांनी देखील केंद्र सरकारच्या कोरोना हाताळणीवर सवाल उपस्थित केला होता. त्यांनी सरकारच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत या तज्ज्ञ समितीतून राजीनामा देखील दिला होता. त्यानंंतर हे प्रकरण व्हायरल झाले होते. केंद्र सरकार जनतेशी खोटं बोलून कोरोनाचे वास्तव लपवत आहे, असा आरोप केंद्र सरकारवर केला जात आहे.

कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवल्याने लोकांना या विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग होण्याचा धोका आहे, असं अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी सांगितलं होतं.  ब्रिटनमध्येही हे दिसून आलं आहे. मात्र कोरोना लसींचा तुटवडा असल्यास दोन डोसमधील कालावधी वाढवण्यास हरकत नाही, असंही अँथनी फाउची यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल, तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा”

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

गजा मारणेवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने फटकारलं

अशी असेल मराठा क्रांती मुक आंदोलनाची रूपरेषा; वाचा सविस्तर माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More