भारनियमनमुक्त महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांच्या नावे वाढीव बिलं

मुंबई | सत्ता असताना शरद पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादीनं भारनियमनमुक्त महाराष्ट्राचा प्रण केला होता. मात्र त्यासाठी चक्क शेतकऱ्यांच्या नावे वाढीव बिलं पाठवल्याचं माहिती अधिकारातून उघड झालंय.

महावितरणमध्ये ज्युनियर मॅनेजर असलेल्या दिवाकर उरणेंना या गोष्टी माहित होत्या, त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी माहिती अधिकारातून हे प्रकरण उघडकीस आणलं.

याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचं महावितरणनं औरंगाबाद खंडपीठात मान्य केलंय. त्यामुळे ३३ लाख शेतकऱ्यांच्या माथी वाढीव बिलं मारणाऱ्यांवर कारवाई कधी? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या