पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचं प्रत्युत्तर, 2 छावण्या उद्ध्वस्त

Photo Credit- ANI

काश्मीर | पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींना भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच पाकिस्तानचे काही रेंजर्स ठार मारल्याचीही माहिती आहे. 

पाकिस्तानने काल शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याचंही समोर आलंय. तसेच दुसऱ्या एका घटनेत दहशतवाद्यांनी कॅशव्हॅनवर केलेल्या हल्ल्यात 5 पोलिसांसह दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे भारतीय जवानांनी सीमेवर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या