महिला विश्वचषक जिंकण्यासाठी भारतापुढे २२९ धावांचं लक्ष्य

Photo- BCCI

लंडन | महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला २२९ धावांचं आव्हान दिलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित ५० षटकात ७ बाद २२८ धावा केल्या. भारताकडून झुलन गोस्वामीने सर्वाधिक तीन जणींना माघारी धाडलं.

दरम्यान, भारतीय संघाला आपला नैसर्गिक खेळ करण्याची आवश्यक्ता आहे. आतापर्यंतची भारताची खेळी पाहता हे आव्हान पेलवणं भारताला शक्य आहे.