पाकच्या गोळीबारात 2 जवान शहीद, शहिदांच्या मृतदेहांची विटंबना

पाकच्या गोळीबारात 2 जवान शहीद, शहिदांच्या मृतदेहांची विटंबना

पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात भारताचे 2 जवान शहीद झालेत तर 3 जवान जखमी झालेत. धक्कादायक प्रकार म्हणजे शहीद जवानांच्या मृतदेहांची पाकिस्तानी सैन्याने विटंबना केल्याचंही समोर येतंय. काश्मीरच्या पूँछमधील मेंढर सेक्टरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. 

दरम्यान, पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवाच्या सीमा पाहणीवेळी पाकिस्तानने हा गोळीबार केल्याची माहिती मिळतेय. बाजवाची ही पाहणी एखाद्या मोठ्या कटाचा भाग असण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. 

Google+ Linkedin