3 दिवस शाळांना सुट्टी, भारत पाकिस्तानवर हल्ला बोलणार?

Army
संग्रहित फोटो

श्रीनगर | पाकिस्तानच्या हल्ल्यात 4 जवान शहीद झाल्यानंतर सीमेवरील शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे भारत पाकिस्तानला धडा शिकवणार असल्याचं मानलं जातंय. 

राजौरी आणि पूँछमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर रात्रभर गोळीबार सुरु होता. भारताने या गोळीबाराला चोख प्रत्यत्तर दिलं. मात्र यामध्ये देखील एक जवान जखमी झाला आहे. 

दरम्यान, आम्ही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत राहू आणि आमच्या कृतीतून ते दिसेल, असा इशारा लष्कराचे उपप्रमुख सरत चंद यांनी पाकिस्तानला दिला आहे.