Top News

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची परंपरा कायम

मँचेस्टर | वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची परंपरा भारताने कायम राखली आहे. मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानपुढे विजयासाठी ३३७ धावांचं आव्हान दिलं होतं. यामध्ये रोहित शर्माने १४०, विराट कोहलीने ७७ आणि केएल राहुलने ५७ धावा केल्या.

पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. १३ धावांवर इमाम उल हक बाद झाला. त्यानंतर बाबर आझम आणि फकर झमानने ११७ धावांपर्यंत भारताला एकही संधी दिली नाही.

२३ व्या षटकात कुलदीप यादवने बाबरला पव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर पाकिस्तानचा डाव कोसळला. २६ व्या षटकात त्यांची ५ बाद १२९ अशी अवस्था झाली.

पावसामुळे पाकिस्तानला ४० षटकात ३०२ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं, मात्र त्यांना ६ बाद २१२ धावाच करता आल्या.

भारताकडून कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि विजय शंकरने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन अन् फडणवीसांनी केली मेहतांची हकालपट्टी

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय!

-रोहित शर्माने पाकला दाखवला हिसका; झळकावलं बहारदार शतक

-#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या