बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विजयानंतर जो बायडेन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन, म्हणाले…

वॉशिंग्टन | अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते लवकरच पदभार स्विकारतील.

निवडणूक जिंकल्यानंतर अनेकांकडून बायडेन यांना शुभेच्छा देण्यात येतायत. यामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत जो बायडेन यांचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “निवडणूकीत तुम्ही मिळवलेल्या नेत्रदीपक विजयासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. याआधीही तुम्ही उपराष्ट्राध्यक्षपदी काम करत असताना भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यादृष्टीने तुमची भूमिका निर्णायक तसंच मोलाची होती.”

“आता देखील तुम्ही निवडून आल्यानंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना अजून उंचावर नेण्यासाठी एकत्र मिळून काम करु अशी अपेक्षा करतो,” असंही मोदी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी; अण्णा हजारेंची टीका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जलसंधारण मंत्र्यांच्या भावजयीचा मृतदेह आढळला; नगर जिल्ह्यात खळबळ!

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यात यश- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More