नवी दिल्ली | टीम इंडियासाठी एक मोठी आणि चांगली खुशखबर आहे. टीमचा अनुभवी ओपनर रोहित शर्मा त्याच्या फिटनेस टेस्टमध्ये पास झालाय.
रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याने टीम इंडियाची एक मोठी चिंता दूर झालीये. फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर आता रोहित शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार असल्याचं समजतंय.
आयपीएलच्या तेराव्या सिजनदरम्यान रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. यामुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्याविरूद्ध वनडे तसंच टी-20च्या सामन्यांसाठी निवड केली गेली नव्हती. मात्र आता फिटनेस टेस्ट पास झाल्याने आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार आहे.
14 कोरोनाच्या परिस्थितीमुळे 14 दिवसांच्या विलगीकरणामुळे रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी सामने खेळू शकणार नाहीये. तर तिसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्मा उपलब्ध असणारे.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांचे आंदोलन भाजपच्या अंगलट, हरियाणातील खट्टर सरकार संकटात
शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास; संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले…
बिबट्याच्या शोधासाठी रोहित पवारांचा पुढाकार; बॅटरी आणि काठी घेऊन केली पाहणी!
#Video- हार्दिक पांड्या म्हणतो; ….तर मुंबईत मराठीतच बोललं पाहिजे!
नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आजी आणि लहान भावाची निर्घृण हत्या