Top News खेळ

नशिबाने थट्टाच मांडली होती, मात्र शेवटच्या षटकांमध्ये जडेजा नावाचं वादळ आलं अन्…

कॅनबेरा | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला कशी नशिबाने थट्टा मांडली असं वाटत असतानाच चमत्कार घडला. शेवटच्या षटकांमध्ये सर रवींद्र जडेजा नावाचं वादळ आलं आणि भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ७ बाद १६१ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलकडून अर्धशतक केले, त्यानंतर रवींद्र जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.

राहुल आणि जडेजा वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताने सातत्याने विकेट गमावल्या त्यामुळे एक वेळ भारताची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.

शिखर धवन १, विराट कोहली ९, संजू सॅमसन २३, मनिष पांडे २, हार्दिक पांड्या १६ आणि वॉशिंग्टन सुंदर ७, अशा भारतीय फलंदाजांच्या धावा आहेत.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी आंदोलनावर अखेर सोनू सूदही बोलला पण जरा जपूनच!

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा!

4 वर्षात पहिल्यांदाच जिओला धोबीपछाड; ‘ही’ कंपनी बनली नंबर वन!

भाजपचा पराभव झाल्यानंतर अमृता फडणवीस म्हणतात; “वाईट सुरुवात…”

उर्मिला मातोंडकरांचा आनंद गगनात मावेना; पाहा काय केलंय ट्विट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या