भारत आणि इंग्लंड दरम्यानचा तो क्रिकेट सामना फिक्स होता?

नवी दिल्ली | भारत आणि इंग्लंड दरम्यान २०११ साली लॉड्सवर झालेला कसोटी सामना फिक्स होता. अनिल मुन्नवर या फिक्सरच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुन्नवरने ६ कसोटी, ६ एकदिवसीय आणि ३ टी-ट्वेंटी सामने फिक्स केले आहेत. यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याचा समावेस आहे.

‘अल जजीरा’ने केलेल्या ‘क्रिकेट मॅच फिक्सर्स- द मुनव्वर फाइल्स’ या लघुपटात यासंदर्भात दावा करण्यात आला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी ७ सामन्यात, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ५ सामन्यात, पाकिस्तानच्या खेळाडूंनी ३ सामन्यात आणि अन्य एका देशाच्या क्रिकेटपटूनं फिक्सिंग केल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.

या गौप्यस्फोटामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून आयसीसी चौकशी करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo मोहिमेनंतर आता #MenToo; पुरुषही अत्याचाराला वाचा फोडणार  

-‘आडतास’ला शांता शेळके प्रतिष्ठानचा साहित्य गौरव पुरस्कार (उत्तेजनार्थ) प्रदान

-अभिनेत्री मेघा धाडे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात  

‘रक्ताळलेले’ अच्छे दिन; शिवसेनेचं भाजपवर जोरदार टीकास्त्र

-नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू