वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम

गयाना | महिला टी-20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या महिला संघाचा दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे विश्वचषक स्पर्धेतील भारतीय महिलांची विजयी घोडदौड कायम आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानी संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून भारतीय गोलंदाजांनी रोखलं. पाकिस्तानला 133 धावा करता आल्या. 

भारताच्या सलामीवीर मिताली राज आणि स्मृती मानधनाने सावध सुरुवात केली. स्मृती 24 धावा करून तंबूत परतली. 

मिताली राजने त्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तीने 56 धावांची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक

-पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात नाशिकचे सुपूत्र शहीद

-केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं निधन

-शेवटच्या चेंडूवर भारताचा अत्यंत थरारक विजय

-नेता असावा तर असा! 21 कार्यकर्त्यांना फुकट वाटल्या दुचाकी