भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 303 धावांचं आव्हान

किम्बर्ली | दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या महिला संघांमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिलांनी आफ्रिकेसमोर 303 धावांचं आव्हान ठेवलंय. भारताकडून सलामीवीर स्मृती मंधनाने शतकी खेळी केली आहे तर हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्थीने अर्धशतक केलं.  

स्मृती आणि हरमनप्रीतने तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी रचली. स्मृतीने 129 चेंडूत 135 धावांची विक्रमी खेळी केली. ज्यामध्ये 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. हे तिच्या वनडे कारकिर्दीचं तिसरं शतक ठरलं.

हरमनप्रीतनेही 69 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या आहेत. तर अखेरच्या काही षटकात वेदा कृष्णमूर्थीने तडाखेबंद खेळी करताना 33 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. द.आफ्रिकेच्या महिलांना आता डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहेय