दिवाळीआधीच रोहित-रायुडूची आतषबाजी; वेस्ट इंडिजपुढे 378 धावांचं आव्हान

मुंबई | दिवाळीआधीच भारतीय संघाने जोरदार आतषबाजी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 377 धावांचा डोंगर उभा केला असून वेस्ट इंडिजला 378 धावांचं आव्हान दिलं आहे. 

भारतीय संघाकडून रोहित शर्माने 137 चेंडूंमध्ये 162 धावा केल्या, तर अंबाती रायुडूने 81 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या. दोघांच्या खेळीने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची पिसं निघाली. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीला आज संगकाराच्या सलग केलेल्या सर्वाधिक 4 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती, मात्र तो अवघ्या 16 धावांवर बाद झाला. 

दरम्यान, आता वेस्ट इंडिजपुढे 378 धावांचं आव्हान आहे. विंडीजच्या संघाला हे आव्हान झेपतं की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंमत असेल तर राम मंदिराचा अध्यादेश आणून दाखवाच- असदुद्दीन ओवेसी

-रोहितची शतकी खेळी; तर रायुडूचंही अर्धशतक

-गरज पडल्यास मातोश्रीवर जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही- देेवेंद्र फडणवीस

-साहित्य संमेलन म्हटलं की, What the F*** फिलिंग येते- सचिन कुंडलकर

-अजित पवारांना यापुढे माफी नाही; बीडमध्ये शिवसैनिकांनी अजित पवारांचा पुतळा जाळला!

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या