नवी दिल्ली | भारतीय बँकेचं कर्ज बूडवून परदेशात पळून गेलेला विजय मल्ल्या आता कंगाल झाला आहे. सध्या विजय मल्ल्या याच्याकडे वकिलाला देण्यासाठी देखील पैसे नसल्याचं समोर आलंय.
विजय मल्ल्याने यु.के.च्या कोर्टात एक तातडीचा अर्ज दाखल केलाय. या अर्जामध्ये मल्ल्याने बँक अकाऊंट हाताळण्याची संमती मागितलीये. तसंच फ्रान्समध्ये असणारी संपत्ती विकल्यानंतर आलेल्या पैशांमधील 14 कोटी रूपये देण्यात यावेत असंही त्याने अर्जात नमूद केलंय.
विजय मल्ल्या याची बँकेची सर्व खाती गोठवण्यात आली होती. मात्र आता पैसे नसल्याने ही खाती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावीत असं मल्ल्याचं म्हणणं आहे.
विजय मल्ल्याच्या वकिलाने वेळेत फी दिली नाही तर न्यायालयात खटला लढणार नसल्याचं सांगितल्याने मल्ल्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. यासाठी वकिलाची फी भरण्यासाठी पैसे हवे असल्याचं अर्जात म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
मुंबई ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम; विदर्भ, कोकणाला पावसाचा इशारा
राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचा आश्चर्यजनक दावा, म्हणाले…
‘लोकहो, शेतकरी मरत आहे!’,म्हणत संजय राऊतांनी केलं आवाहन
शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं; प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
फेक टीआरपीप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; रिपब्लिक चॅनेलच्या ‘या’ व्यक्तीला अटक