IND vs AFG T20 Squad l क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान ही टी-20 स्पर्धा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच टीम इंडियाने आज अफगाणिस्तान विरुद्धचा संघ जाहीर केला आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक दिग्गज खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. तर अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळाले आहे हे पाहुयात…
टी20 मालिका भारतासाठी महत्त्वाची ठरणार! :
आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने अफगाणिस्तान संघाच्या विरुद्धची टी20 मालिका भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या विश्वचषकाकडे सर्वच भारतीयांचे लक्ष असणार आहे. काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध अफगाणिस्तान विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
वेळापत्रकानुसार या विश्वचषक स्पर्धेला 11 जानेवारी 2024 पासून सुरवात होणार आहे. तर दुसरा सामना 14 जानेवारी 2024 ला इंदूरमध्ये तर तिसरा सामना 17 जानेवारी 2024 ला बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान विश्वचषक टी-20 स्पर्धेमध्ये (IND vs AFG T20 Squad) ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पांड्यासोबतच सूर्यकुमार यादव देखील खेळणार नाही.
IND vs AFG T20 Squad l या दिग्गज खेळाडूंना मिळाले संघात स्थान :
भारत विरुद्ध अफगाणिस्तान विश्वचषक टी-20 स्पर्धेमध्ये ईशान किशनच्या जागी निवडकर्त्यांनी संजू सॅमसनवर विश्वास दाखवला आहे. संजू सॅमसन या खेळाडूला बऱ्याच कालावधीनंतर संघात प्रवेश मिळालेला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचे संजू सॅमसनच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 वेळापत्रक (IND vs AFG T20 Timetable) :
पहिला सामना
दिनांक : 11 जानेवारी 2024
ठिकाण : पंजाब क्रिकेट असोसिएशन IS बिंद्रा स्टेडियम, मोहाली
दुसरा सामना :
दिनांक : 14 जानेवारी 2024
ठिकाण : होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर
तिसरा सामना :
दिनांक : 17 जानेवारी 2024
ठिकाण : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
IND vs AFG T20 Squad l अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेसाठी जाहीर केलेला भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव या खेळाडूंना संघात निश्चित स्थान मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
Team India | अखेर ट्वेंटी-20 संघात रोहित-विराटची एन्ट्री; वर्ल्ड कपची तयारी सुरू?
Team India ची विजयी सलामी पण पाहुण्यांच कमबॅक; दुसऱ्या सामन्यात भारत चीतपट
Shakib Al Hasan बनला खासदार! विजयाचं सेलिब्रेशन अन् चाहत्याच्या दिली कानशिलात, VIDEO
Aditya Thackeray विदर्भाकडून मैदानात; रणजी ट्रॉफीचा थरार सुरू!