मुंबई | चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत एतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाने भारताने बोर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विजयाची हॅट्रीक केली आहे. तर गाबाच्या मैदानावर सलग 28 कसोटी सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या विजयी रथाला रोखलं आहे.
भारतीय संघातील प्रमुख खेळाडू नसतानाही युवा आणि काही अनुभवी खेळांडूंनी केलेल्या सांघिक कामगिरीने हा विजय मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना भरगच्च बोनस यावेळी जाहीर केला आहे.
ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाला यावेळी पाच कोटी रुपयांचा बोनस बीसीसीआयने जाहीर केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबतची माहिती दिली असून बीसीसीआयने याबाबतचे ट्विटही केलं आहे.
दरम्यान, भारतीय संघाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर दोन सामन्यांसाठी कर्णधार असलेला मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनेही आपल्याकडील नेतृत्वाची छाप सोडली आहे.
“The BCCI has announced INR 5 Crore as team bonus”- BCCI Secretary Mr @JayShah tweets.#TeamIndia pic.twitter.com/vgntQuyu8V
— BCCI (@BCCI) January 19, 2021
थोडक्यात बातम्या-
मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे- उदयनराजे भोसले
मुलीचा धक्कादायक पराभव पण भास्कर पेरे पाटलांना नाही खंत, कारण…
“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”
“मी मोदी सरकारला घाबरत नाही, हे लोक मला हात लावू शकत नाहीत पण…”
“काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकतं?”