Top News खेळ

रात्री लवकर न झोपल्याचे परिणाम; अंपायरने भर मैदानात केलं असं काही की….; पाहा व्हिडीओ

मेलबर्न | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झालीये. तर या सामन्याच्या पहिल्या दिवशी एक गमतीशीर प्रकार घडला. मुख्य म्हणजे हा गमतीशीर प्रकार कॅमरामध्ये कैद झालाय.

सध्या टी-20 सामन्यांसमोर कसोटी सामना म्हटलं की अनेकांना पाहण्याचा कंटाळा येतो. आजच्या सामन्यात देखील खेळट्टीवर फारसं काही घडत नसल्याने अंपायरना देखील कंटाळा आला असल्याचं दिसून आलं. तर सामन्यादरम्यान अंपायरनी उभ्या जागेवर जांभई दिली.

अंपायरचा जांभई देतानाचा क्षण कॅमेरानने मात्र लगेच टिपला. शिवाय याचा व्हिडीयो ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्टही करण्यात आलाय.

ख्रिसमसच्या मोठ्या सुट्टीवरून जेव्हा तुम्ही कामावर रुजू होता तेव्हा तुमची होणारी अवस्था, असं कॅप्शन देखील या व्हिडीयोला देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ईडीवरून सीडी लावण्याच्या खडसेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा; मनसेची मागणी

“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा”

‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलास

‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्यानं केलं भाकीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या