मुंबई | भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरूवातीची फलंदाजी ढेपाळली. मात्र शार्दुल ठाकुर आणि वाशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या फलंदाजीने कांगारूंची बोलती बंद करत मोठा पराक्रम केला आहे.
दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला आणि कपिल देव व मनोज प्रभाकर यांचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. शार्दुल ठाकुर आणि वाशिंग्टन सुंदरने दोघांनी अर्धशतकी खेळी केली आहे.
यासोबतच पहिली कसोटी खेळणाऱ्या सुंदरने केलेल्या अप्रतिम फलंदाजीने 110 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पराक्रमी कामगिरी करणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियात पदार्पणात 1911नंतरची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. 110 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या फ्रँक फोस्टर यांनी 56 धावा चोपल्या होत्या. सुंदर अजुनही फलंदाजी करत आहे. भारताची धावसंख्या 319-7 बाद इतकी असून सुंदर वैयक्तिक 60 धावांवर खेळत आहे.
थोडक्यात बातम्या-
‘बिग बॉस14’ मधील पिस्ता धाकडचा व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत्यू
“महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा”
“योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो”
‘सर तुम्ही पेलाय’! गाडीला धडकी दिली म्हणून मांजरेकरांनी मारली चापट
“औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात एकपण शहर नको, ही शिवभक्ती म्हणा नाहीतर इतिहासाचा भान”