कसोटी इतिहासात हे चौथ्यांदा घडलं, भारताच्या ‘या’ खेळाडूने केला ऐतिहासिक रेकॉर्ड

IND vs ENG 5th Test | भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (IND vs ENG 5th Test) आजपासून (7 मार्च) धर्मशाला येथे खेळला जात आहे. याच सामन्यात भारताच्या स्टार प्लेयरने इतिहास रचला आहे. भारताचा रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांनी या सामन्यात इतिहास रचला आहे.

रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो या दोघांचाही हा 100 वा कसोटी सामना आहे. अश्विन आणि बेअरस्टो या दोघांनी एकाच सामन्यात त्यांच्या 100 व्या कसोटी सामना खेळायला उतरल्याने एक विशेष विक्रम निर्माण झाला आहे.

अश्विन-बेअरस्टो जोडीने रचला इतिहास

कसोटी इतिहासमध्ये (IND vs ENG 5th Test) हे चौथ्यांदा घडले आहे. दोन किंवा अधिक खेळाडू एकत्र येऊन 100 वा सामना खेळण्याची ही यावर्षी चौथी वेळ आहे. यापूर्वी असे तिनवेळा घडले आहे. आर अश्विन हा टीम इंडियाकडून 100 वा कसोटी सामना खेळणारा 14 वा भारतीय ठरला आहे. तसेच अश्विन भारतासाठी 100 सामने खेळणारा चौथा गोलंदाज ठरलाय.

यावेळी अश्विन आपल्या कुटुंबासोबत येथे उपस्थित होता. टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी सामन्याअगोदर त्याला खास कॅप दिली. अश्विनसोबतच इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यानेही हा रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना आता सोशल मिडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अश्विन-बेअरस्टो यांचा 100 वा कसोटी सामना

यपूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल अथर्टन आणि ॲलेक स्टीवर्ट यांनी 2000 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली तेव्हा पहिल्यांदाच असे घडले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे जॅक कॅलिस, शॉन पोलॉक आणि न्यूझीलंडचे स्टीफन फ्लेमिंग हे तिन्ही खेळाडू आपला 100 वा कसोटी सामना खेळले होते.

तर, 2013 मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांनी आपला 100 वा कसोटी सामना खेळला होता. आता भारत विरुद्ध इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 5th Test) भारताचा रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहेत.

News Title- IND vs ENG 5th Test R Ashwin And Jonny Bairstow Play Their 100th Test Match

महत्त्वाच्या बातम्या –

“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी