बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IND vs ENG: कोरोनाच्या भीतीमुळे वरिष्ठ खेळाडूचा पाचवी टेस्ट खेळण्यास नकार?

मँचेस्टर | भारतीय संघाचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पाचव्या कसोटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र मँचेस्टर टेस्ट सर्व भारतीय खेळाडूंचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर दोन्ही क्रिकेट मंडळांनी सामना वेळेवर सुरू करण्यास सहमती दर्शवली. यातच कोरोनाची भीती वाढत चालली असल्यानं वरिष्ठ खेळाडूनं ही टेस्ट खेळण्यास तयार नसल्याची बातमी समोर येत आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून सुरु होणारी टेस्ट होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र अशातच आता टीमचे ज्यूनिअर फिजियो योगेश परमार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे.’पीटीआय’च्या वृत्तानुसार वरिष्ठ खेळाडूनं कोरोनाची परिस्थितीमुळे कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती आणखी खराब होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे.

सध्या या वरिष्ठ खेळाडूला समजावून सांगण्यात येत आहे. ईसीबी अध्यक्ष टॉम हॅरीसन हे त्याच्याशी चर्चा करुन त्याची काळजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वरिष्ठ खेळाडूनं आपलं मत बदललं नाही तर त्याला आराम करण्याचा सल्ला जाऊ शकतो.

दरम्यान, मँचेस्टरमध्ये दाखल झाल्यावर भारतीय संघातील खेळाडूंना आज हॉटेलमधून बाहेर सोडण्यात आले नव्हते. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला आपल्या हॉटेल रुममध्ये राहण्याची सक्त ताकिद देण्यात आली होती. आता सगळ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष आज होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टकडे लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“घरकोंबड्या सरकारमुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरूये”

लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घेता येणार, प्रसादही घरपोच मिळेल

पुतीन यांनी तालिबान सरकारला खडसावलं, म्हणाले…

गणेशोत्सवाआधीच राज्यात कोरोनाचा रूद्रावतार; रुग्णांचा आकडा पुन्हा 50 हजार पार

गर्भवती महिलेला तराफ्यावरून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात, वाचा थरारक प्रवास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More