Ind vs Eng l टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सुपर-8 च्या आपल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखले आणि सलग दुसऱ्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने ग्रुप-1 मध्ये पहिले स्थान मिळवले आणि शेवटच्या 4 मध्ये स्थान मिळवले आहे.
टीम इंडियाचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार :
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला 15.2 षटकात विजय मिळवण्यापासून रोखले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता टीम इंडियाचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
यावेळी टीम इंडियाला आता 2 वर्ष जुन्या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे. सुपर-8 चे पहिले आणि दुसरे सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार हे निश्चित वाटत होते. तरीही त्याला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करायचा होता.
Ind vs Eng l टीम इंडियाला इंग्लंडचा बदल घेण्याची संधी :
टीम इंडियाने सुपर-8 चे तिन्ही सामने जिंकले आणि अशा प्रकारे गटात पहिले स्थान मिळवले आहे. अशातच आता टीम इंडियाचा सामना गट-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होणार आहे. ग्रुप-2 मधून इंग्लंडने प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, मात्र दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करत पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत नियमानुसार टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड हा उपांत्य सामना 27 जून रोजी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.
आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे तब्बल 595 दिवसांनंतर टीम इंडियाला इंग्लंडचा बदला घेण्याची संधी आली आहे. शेवटच्या T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. त्यानंतर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आणि विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे आता तब्बल 595 दिवसांनंतर रोहितसेना इंग्लंडचा बदल घेणार आहे.
News Title – Ind vs Eng T20 World Cup Semi final
महत्त्वाच्या बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय! महायुतीला धक्का बसणार?
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली माय मराठीतून शपथ; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने ‘या’ राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ होणार