पोरींनो… वर्ल्डकप सोडा, तुम्ही कोट्यवधी भारतीयांची मनं जिंकलीत!

लंडन | महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारताला कडवं आव्हान देणारा इंग्लंड जगज्जेता ठरला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी २२९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. स्मृती मंधाना शून्यावर माघारी परतली. 

दुसरीकडे पूनम राऊतने झुंजार खेळी केली. तिने ११५ चेंडूत ८६ धावा केल्या. तिला ८० चेंडूत ५१ धावा करुन हरमनप्रीत कौरनं चांगली साथ दिली. विजय भारताच्या पारड्यात जमा होतोय, असं वाटत असताना मात्र दोघी माघारी परतल्या. त्यानंतर मात्र भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या