बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटपेक्षा रोहितच लय भारी! संघाची सूत्रं हाती आल्यावर निसटलेला सामना आणला खेचून

मुंबई | सध्या भारत आणि इंग्लंडमधे चालू असलेल्या टी-20 मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे . चौथ्या सामन्यात भारताच्या हातून सामना निसटत चालला असं वाटत असताना भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माकडे टीमची सूत्र आल्यावर त्याने शार्दुलला दिलेलं षटक आणि भारताला मिळालेल्या दोन विकेट्सने संपुर्ण सामना भारताकडे झुकला.

भारताने दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरूवात निराशाजनक झाली. मात्र त्यानंतर बेअस्टो आणि स्टोक्स यांनी केेलेल्या महत्त्वपुर्ण भागिदारीमुळे सामन्याचं चित्र बदलू लागलं होतं. शेवटच्या चार षटकांमध्ये इग्लंडला 46 धावांची गरज होती. त्यावेळी कर्णधार विराट कोहली दुखापत झाल्याने बाहेर बसला होता.

विराट बाहेर बसल्यावर टीमची सूत्र रोहित शर्माकडे आलीत. रोहितने शार्दुलकडे चेंडू सोपवला आणि शार्दुलनेही त्याचा निर्णय योग्य ठरवत दोन चेंडूत स्टोक्स आणि इंग्लंडच्या कर्णधाराला माघारी धाडलं. सामना भारताच्या झुकला असं वाटत असताना आर्चर आणि जॉर्डन यांनी चौकार आणि षटकार मारत धावसंख्या वाढवली. अखेरच्या षटकात पुन्हा शार्दुल गोलंदाजी करत होता. मात्र त्याच्या पहिल्या तीन चेंडूत 11 धावा आल्या आणि त्यावेळी त्याने दोन वाईड बॉल टाकले.

दरम्यान, शार्दुल त्यावेळी दबावात होता मात्र रोहित शर्माने त्याचाजवळ जात त्याला कानमंत्र दिला. उर्वरित 3 चेंडू शार्दुलने आपली चमक दाखवली. त्यानंतर त्यावे एकच धाव दिली आणि भारताचा विजय नोंदवला. मात्र रोहितने दाखवलेला संयम आणि चोखपणे सांभाळलेल्या जबाबदारीमुळे टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद त्याच्याकडे देण्याची मागणी क्रिकेटप्रेमींमधून होत आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मी नरेंद्र मोदी नसून फसवणार नाही, मी तुम्हाला…’; राहुल गांधींनी दिली ही पाच आश्वासनं

राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडेनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनावरील लसीचा ‘DNA’ वर परिणाम होतो का? आरोग्यमंत्री म्हणाले…

आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही- ममता बॅनर्जी

महाराष्ट्र सरकारकडुन कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी; ‘हे’ आहेत नवे नियम!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More