बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल, जडेजाने ठोकलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताकडे ‘इतक्या’ धावांची आघाडी, अँडरसन आणि रॉबिनसनची भेदक गोलंदाजी!

मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पहिला डाव 278 धावांवर आटोपला आहे. भारताकडे पहिल्या डावात 95 धावांची आघाडी आहे. सलामीवीर के. एल. राहुल आणि जडेजाच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने आघाडी घेतली.

चांगली सुरूवात होऊनही भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा बाद झाल्यावर मधल्या फळीच्या फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार विराट कोहली भोपळा न फोडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला, चेतश्वर पुजाराही अवघ्या 4 धावांवर बाद झाला तर अजिंक्य रहाणे 5 धावांवर धावबाद झाला. त्यामुळे भारत ऑलआऊट होतो की काय अशी स्थिती झाली होती त्यानंतर पंत आणि राहुलने डाव सांभाळला.

आजच्या दिवशी पंतही बाद झाला तर दुसरीकडे राहुलची एकाकी झुंज चालू होती. राहुल बाद झाल्यानंतर जडेजाने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक पुर्ण केलं. त्याने 56 धावा केल्या यामध्ये 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.

दरम्यान, इंग्लंडचे गोलंदाड जेम्स अँडरसन आणि रॉबिनसन यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. शेवटी येत बुमराहने 24 धावा करताना 3 चौकार आणि 1 षटकार मारले आणि धावसंख्या वाढवली.

थोडक्यात बातम्या-

बुलेटवर कपल करत होतं अश्लील चाळे त्यानंतर गावकऱ्यांनी गाडी अडवुन…पाहा व्हिडीओ!

पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत वाद पेटला! आता फडणवीस मेट्रोची पाहणी करणार

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

अकरावी सीईटीवर न्यायालयाची सुनावणी, ‘या’ तारखेला विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार

“औषधापेक्षा रुग्णांची मानसिकता बदलवून 25 हजार रुग्ण कोरोनामुक्त केले, मी सुद्धा 50% डॉक्टर झालो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More