भारतीय संघाचं नेहराला अनोखं गिफ्ट, विक्रमी विजयासह निरोप!

भारतीय संघाचं नेहराला अनोखं गिफ्ट, विक्रमी विजयासह निरोप!

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघानं आपला वेगवान गोलंदाज आशिष नेहराला त्याच्या अखेरच्या सामन्यात विजयाचं गिफ्ट दिलंय. न्यूझीलंडचा 53 धावांनी दणदणीत पराभव करुन भारतानं हा सामना खिशात घातला. 

नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या चांगलाच अंगलट आला. रोहित-धवन जोडीच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. 

भारताच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची टीम ढेपाळली. निर्धारित 20 षटकात त्यांना 8 बाद 1

 

49 धावाच करता आल्या. दुर्देवाने आशिष नेहराला त्याच्या शेवटच्या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. 

Google+ Linkedin