टीम इंडिया जिंकताच पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे गंभीर सवाल, व्हिडिओ व्हायरल

IND vs NZ Shoaib Akhtar Questions PCBs Absence

IND vs NZ |  भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने एक व्हिडीओ पोस्ट करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. (IND vs NZ)

भारताच्या विजयावर शोएब अख्तरची प्रतिक्रिया

भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले. यापूर्वी भारताने 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कपही जिंकला होता. न्यूझीलंडने दिलेलं 252 धावांचं आव्हान भारताने 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून सहज पार केलं.

या ऐतिहासिक विजयानंतर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शोएब अख्तरच्या मते, पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान होते, मात्र तरीही अंतिम सामना आणि बक्षीस वितरण समारंभात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. आयसीसी अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी हे या सोहळ्यासाठी हजर होते, मात्र पाकिस्तानकडून कोणीही उपस्थित नसल्याने अख्तरने आश्चर्य व्यक्त केले.

PCBच्या अनुपस्थितीबाबत अख्तरचा सवाल

शोएब अख्तरने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले की, “भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मात्र, मला सर्वात विचित्र गोष्ट वाटली ती म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही प्रतिनिधी इथे नव्हता. पाकिस्तान हे या स्पर्धेचे यजमान होते, मग तरीही त्यांच्याकडून कोणी का नव्हते? जागतिक स्तरावरील स्पर्धेत यजमान देशाचे प्रतिनिधी असणे आवश्यक असते. ट्रॉफी वितरण समारंभात ते दिसायला हवे होते. पण तसे का झाले नाही?” (IND vs NZ)

याशिवाय अख्तरने बीसीसीआयच्या भूमिकेचा दाखला देत सांगितले की, भारत-पाकिस्तान संबंध चांगले नसतानाही 5 मार्चला बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी उपस्थित होते. मात्र, अंतिम सामन्यात पीसीबीचे कोणीही सदस्य उपस्थित नसल्याने अख्तरने तीव्र नाराजी व्यक्त केली. आता पीसीबी यावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताची विजयी प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन: मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ.

Title : IND vs NZ Shoaib Akhtar Questions PCBs Absence

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .