खेळ

#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!

मुंबई |  आज मॅन्चेस्टरमध्ये भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्द हायव्होल्टेज सामना रंगत आहे. मागच्या डावात जायबंदी झालेल्या शिखर धवनची उणीव ऐनवेळी संघात समावेश झालेल्या के. एल. राहुलने भरून काढली आहे.

रोहित शर्माच्या साथीने सलामीवीर के. एल राहुलने 57 धावा करून भारताला आश्वासक सुरूवात करून दिली. शिखर धवनच्या अनुपस्थितीत त्याने चांगली खेळी केली.

धवनची अनुपस्थिती त्याने जाणवू दिली नाही. त्याने 78 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. या खेळीला त्याने 3 चौकार आणि 2 षटकारांचा साज चढवला.

दरम्यान, वहाब रियाजच्या गोलंदाजीवर बाबर आझमकडे तो झेल देऊन बाद झाला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 28.4 षटकांमध्ये 1 गडी बाद 165 धावा झाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

-पाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक

-लांडगे-जगताप ‘वंचित’; मुख्यमंत्र्यांनी बाळा भेगडेंना दिला मंत्रिपदाचा नजराणा

-काँग्रेसचा ‘हा’ आमदार म्हणतो, मी पुन्हा आमदार व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा

-नापास होण्याचा आणि आयुष्याचा काहीही संबंध नसतो; राज ठाकरेंचं तरूणांना मार्गदर्शन

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीली सरपंचांना पत्रं; केलं हे आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या