खेळ

पाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक

मॅन्चेस्टर |  आज बहुप्रतिक्षित भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपमधला हायव्होल्टेज सामना रंगत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची बॅट तळपलेली दिसून आली.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी डावाची अतिशय चांगली सुरूवात केली. रोहित शर्माने 35 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं.

भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट होतं परंतू वरूणराजाने आज मात्र विश्रांती घेतली आहे. 22 षटकांचा सामना होईपर्यंत तरी पाऊस आलेला नाही.

दरम्यान, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 22.4 षटकांमध्ये भारताने बिनबाद 128 धावा जमवल्या होत्या. यात रोहित शर्मा 64 चेंडूंमध्ये 74 धावांवर तर के. एल राहुल 74 चेंडूंमध्ये 57 धावांवर खेळत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-लांडगे-जगताप ‘वंचित’; मुख्यमंत्र्यांनी बाळा भेगडेंना दिला मंत्रिपदाचा नजराणा

-काँग्रेसचा ‘हा’ आमदार म्हणतो, मी पुन्हा आमदार व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा

-नापास होण्याचा आणि आयुष्याचा काहीही संबंध नसतो; राज ठाकरेंचं तरूणांना मार्गदर्शन

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीली सरपंचांना पत्रं; केलं हे आवाहन

-प्रकाश मेहतांना भ्रष्टाचाराचं प्रकरण भोवलं; अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी बसवलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या