भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

IND VS PAK | आज न्यूयॉर्कमध्ये टीम इंडिया विरूद्ध पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यात लढत होणार आहे. केवळ भारत आणि पाकिस्तानच नाहीतर अवघ्या देशाचं लक्ष हे या सामन्याकडे लागलं आहे. टीम इंडिया विरूद्ध पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यात होणाऱ्या सामन्याला ऐतिहासिक सामना म्हणून पाहिलं जात आहे.

या सामन्यावर पावसाची टांगती तलवार असल्याने दोन्ही संघाच्या खेळात आणि त्यांच्या रणनीतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी खेळाडू वसीम अक्रमने विजयाची ट्रिक सांगितली आहे. कोणती ओव्हर महत्त्वाची असेल. न्यूयॉर्कमधील खेळपट्टी स्लो आहे. त्यामुळे आता कसोटी सामन्याप्रमाणे फलंदाजी करावी लागणार आहे. शेवटची पाच षटके महत्त्वाची असणार आहेत, असं अक्रमने म्हटलं आहे.

काय म्हणाला होता वसीम अक्रम?

न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे याठिकाणी केवळ 170 नाही तर 140 धावा केल्या तरी चांगला खेळ आहे. तेव्हा कसोटीप्रमाणे खेळावं लागणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत विकेट टिकवून खेळावं लागणार आहे. तसेच शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 140 किंवा 150 धावा नेता येणार आहे. प्रथम खेळपट्टीवर फलंदाजी करत असताना खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असून धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे.

टी 20 सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानवर भारी

टीम इंडिया विरूद्ध पाकिस्तान (IND VS PAK) हे दोन्ही संघांमध्ये अनेकदा अटीतटीचे सामने झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये टी 20 चे 12 सामने झाले आहेत. 12 सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे.

टीम इंडियाचा पहिला टी-20 सामना नुकताच पार पडला आहे. अयरलँडविरूद्ध टीम इंडियाने पहिला विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आपले आठ गडी राखून विजय मिळवला. यासामन्यात रोहित शर्माने चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकवलं. मात्र विराट कोहली खातं खोलून बाद झाला. मात्र टीम इंडियाने विजय मिळवला.

टीम इंडिया विरूद्ध पाकिस्तान संघाच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. ज्या भागात सामना आहे तिथे नासाऊ काऊंटीमधील वातावरण बे भरवशाचे आहे. जर सामन्या दरम्यान पाऊस आल्यास क्रिकेटप्रेमी निराश होतील.

News Title – IND VS PAK T20 Match At New York Over Rain

महत्त्वाच्या बातम्या

मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?; फायनल यादी आली समोर

मोठी बातमी! राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा; हायअलर्ट जारी

“वादा तोच दादा नवा”; बारामतीत झळकले अजित पवारांना डिवचणारे बॅनर्स

“जो मराठा समाजाला त्रास देणार त्याला विधानसभेत…”, मनोज जरांगेंची तोफ कडाडली

“पुणेकरांना समुद्र नसल्याची खंत होती, म्हणून भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला”