IND vs PAK l संपूर्ण जग भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. हा सामना न्ययॉर्कमध्ये 9 जूनला खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यावर संकटाचे ढग दाटून आल्याची माहिती समोर आली आहे. कारण 9 जूनला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचे संकट :
T20 विश्वचषक 2024 चा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार हा सामना सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. पण भारतात हा सामना संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल. मात्र आता न्यूयॉर्कमध्ये 51 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पावसाच्या संदर्भात अतिरिक्त व्यवस्था केली आहे, परंतु लीग सामन्यांसाठी असे काहीही नाही. म्हणजेच, जर पावसामुळे सामना विस्कळीत झाला तर तो दुसऱ्या दिवशी आयोजित केला जाणार नाही, परंतु हा सामना रद्द मानला जाईल. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळणार आहे.
IND vs PAK l तिकीटाची किंमत असणार लाखोंच्या घरात :
भारत-पाकिस्तान सामन्याचे सामान्य तिकीट किंमत तब्बल 25 हजार रुपये आहे, याशिवाय प्रीमियम तिकिटाची किंमत तब्बल 2 लाख ते 8.5 लाख दरम्यान आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या दक्षिण आशियाई समुदायासाठी ही किंमत सर्वात जास्त आहे. भारतीय स्पोर्ट्सप्रेमींना वर्ल्ड कप मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाइव्ह पाहता येणार आहे. तर मोबाईलवर फुकटात सामना डिस्ने हॉटस्टार ॲपवर पाहता येईल.
खेळपट्टीचा विचार केला तर टी-20 विश्वचषक 2024 मधील खेळपट्टीची सर्वाधिक चर्चा होत आहे. नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ‘ड्रॉप इन पिच’ या खेळपट्ट्यांचा वापर देखील करण्यात आला आहे. येथे भारत आणि आयर्लंड यांच्यात निकटचा सामना झाला आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अवघड आहे. कारण या खेळपट्टीवर फलंदाज नेहमीच जखमी होत आहेत.
News Title – Ind Vs Pak T20 World Cup Match
महत्त्वाच्या बातम्या
मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय!
एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका; ऑनलाईन सेवा बंद राहणार
नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा असणार खास; शपथविधी कधी व किती वाजता होणार?
राज्यात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाने दिला सतर्क राहण्याचा इशारा
आज या तीन राशींना पैशांची कमी भासणार नाही