T20 World Cup फायनल आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर!

Ind Vs South Africa | टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका (Ind Vs South Africa) संघात आज (29 जून) टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. खासकरून हा सामना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी फार महत्त्वाचा असेल. कारण रोहित शर्मा कदाचित टी 20 मधून निरोप घेऊ शकतो अशी शक्यता आहे. नुकतंच  ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पॉटिंगने टीम इंडियाने हा अंतिम सामना जिंकावा अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र अशातच सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

दोन्ही संघ तुल्यबळ

दोन्ही संघ हे तुल्यबळ संघ आहेत. सध्या टीम इंडियाचा देखील तितकाच बोलबाला आहे. दोन्ही संघ एकही सामना पराभूत झाले नाहीत. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कर्णधार पदाची भूमिका घेत खेळी करत आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ हा एडन मार्करमच्या नेतृत्त्वाखाली कामगिरी करत आहे. (Ind Vs South Africa)

द. आफ्रिकेने आफगाणिस्तानवर एकहाती विजय मिळवला आहे. टीम इंडियाने देखील सुपर 8 मध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. आज शनिवार 29 जुलै दिवशी टीम इंडिया विरूद्ध द. आफ्रिका यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. याआधी सेमीफायनलमध्ये पावसाचं सावट होतं. मात्र नंतर पावसाने साथ दिली आणि संघ विजयाच्या दारात पोहोचला. (Ind Vs South Africa)

अशात अंतिम सामाना सुरू होण्याआधी टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी अंतिम सामन्यात असणाऱ्या अंपायरबाबत आहे. ज्याची घोषणा ही शुक्रवारी आयसीसीने केली आहे. (Ind Vs South Africa)

आयसीसीने अंतिम सामन्यांसाठी न्यूझीलंडचे क्रिस गॅफनी आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ या अंपायर्सकडे मुख्य अंपायर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर टीव्ही अंपायर म्हणून इंग्लंडचे रिचर्ड कॅटलबरो यांची निवड केली आहे. मात्र एक अंपायर ही टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे. (Ind Vs South Africa)

‘या’ अंपायर्समुळे टीम इंडिया पराभूत होते?

तीन अंपायर्सपैकी कॅटलबरो आणि इलिंगवर्थ हे टीम इंडिया खेळत असताना अंपायरची भूमिका बजावतात. तेव्हा टीम इंडियाला म्हणावं असं यश मिळत नाही. ते नेहमी पराभूत होतात. टीम इंडियाने अनेकदा याचा सामना देखील केला आहे. ते आता द. आफ्रिका विरूद्ध टीम इंडिया यांच्या अंतिम सामान्यात येणार असल्याचं चित्र आहे.

News Title – Ind Vs South Africa Final Match T20 World Cup 2024 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील ‘या’ भागात घडली धक्कादायक घटना! 14 वर्षांच्या मुलानं अनेकांना टँकरनं उडवलं

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; ‘या’ दिवसापासून द्यावे लागणार जास्त पैसे

1 जुलैनंतर सिम पोर्ट करणे होणार अत्यंत अवघड, अन्यथा बसू शकतो लाखोंचा दंड

या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळणार

Diabetes रुग्णांसाठी जांभूळ एक वरदानच; जाणून घ्या याचे फायदे