खेळ

कसोटी मालिकेचा असा शेवट कधी पाहिलात का???

रांची : भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत 3-0 ने मालिका खिशात घातली आहे. अंतिम कसोटीमध्ये लुंगी एन्गीडीचा झेल एकदम चर्चेचा विषय ठरला आहे. लुंगी एन्गीडी हा एकदम आगळ्यावेगळ्या प्रकारे बाद झाला.

डे ब्रून बाद झाल्यानंतर आलेल्या लुंगी एन्गीडीने आपल्या पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारला, तो चेंडू थेट नाॅन स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या हेल्मेटवर बसला.

हेल्मेटवर बसलेला चेंडू हवेत उडाला अन् तो चेंडू पकडत नदीमने एन्गीडीला झेलबाद केले. अशा पद्धतीने मालिकेचा शेवट झालेला क्वचितच कधी पाहायला मिळाला असेल.

दरम्यान, भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला आहे. यासोबतच भारताने पाहुण्या आफ्रिकन संघाला व्हाइटवॉश दिला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या