कोलकाता | नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव 172 धावांवर गुंडाळण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आलं. 59.3 षटकांमध्येच भारताचा खेळ खल्लास झाला.
भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून सुरंगा लकमलने सर्वाधिक 4 बळी घेतले.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा बोलबाला राहिला. त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त 11 षटकांचा खेळ झाला. तर दुसऱ्या दिवशीही 21 षटकांचाच खेळ होऊ शकला.
Comments are closed.