कोहलीच्या शतकासोबत भारताचं श्रीलंकेपुढे ‘विराट’ आव्हान!

कोलंबो | गॉल कसोटीत भारताने आपला दुसरा डाव २४० धावांवर घोषित केला आहे. त्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीसोबतच भारताने श्रीलंकेला विजयासाठी ५५० धावांचं आव्हान दिलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या डावात १०३ धावांची खेळी केली. हे त्याचं १७ वं कसोटी शतक ठरलं.

दरम्यान, भारतानं पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभारला होता. तर श्रीलंकेचा पहिला डाव २९१ धावांत कोसळला होता.