बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

मुंबई | भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेली एकदिवसीय मालिका खिश्यात घातल्यानंतर आता भारत आणि श्रीलंका यांच्यात टी 20 सामन्याला सुरूवात झाली आहे. श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टी 20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांना गारद केलं. त्यासोबतच भारताने टी 20 मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शाॅ बाद झाला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने संयमी खेळी करण्यास सुरूवात केली. तर दुसऱ्या बाजूने संजू सॅमसंगने फटकेबाजी सुरू केली. संजू बाद झाल्यावर सुर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत दमदार अर्धशतक पुर्ण केलं. सामन्यादरम्यान हलका पाऊस येऊ लागला. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी सुरू केली. त्यामुळे एकामागोमाग शिखर धवन, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या बाद झाले. अखेर इशान किशनने शेवटी फटकेबाजी करत धावसंख्या 164 पर्यंत पोहोचवली.

भारताने दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरवात चांगली झाली. कृणाल पांड्याने भारताला पहिला गडी बाद करून दिला. त्यानंतर आविश्का फर्नांडोने चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर फिरकीपटू यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेला एकामागोमाग एक दोन झटके दिले. त्यानंतर श्रीलंकेचे कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. श्रीलंकेचा पुर्ण संघ 126 धावांवरच गारद झाला. 8 चेंडू बाकी असताना भारताने हा सामना सहज जिंकला. भारताचा गोलंदाज आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने धारदार गोलंदाजी करत 4 गडी बाद केले.

दरम्यान, या विजयासोबतच भारताने 3 सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. याआधी भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध खेळली गेलेली एकदिवसीय मालिका 2-1 अशी फरकाने जिंकली होती. एकदिवसीय सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला टी 20 सामन्यात देखील काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने मोक्याच्या क्षणी 12 चेंडूत केवळ 10 धावा केल्या होत्या. पांड्याच्या या कामगिरीवर आता वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर; पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

काही सेकंदातच लोखंडी पूल उद्ध्वस्त झाला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर

“भास्कर जाधव हे तमाशातील सोगांड्या आणि दशावतारातील शंकासूरच”

“राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका, आम्ही वेटिंगवरच आहोत”

‘बचपन का प्यार’ फेम सहदेवला रॅपर बादशाहकडून मोठी ऑफर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More