ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया | भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात थरारक विजयाची नोंद केली. ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं, सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये तर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
हेच क्षण सामना चित्रीत करणाऱ्या कॅमेरामन्सनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. या क्षणांची एक सुंदर चित्रफित बनवण्यात आली असून सोशल मीडियावर ती टाकण्यात आली आहे.
शेवटच्या काही षटकांमध्ये क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा, आशा-निराशेचे हिंदोळे, ताण-तणाव, हर्ष अशा साऱ्याच भावना अगदी लिलया आणि नकळतपणे या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत.
भारतासाठी जितका हा विजय अविस्मरणीय आहे तितकीच ही व्हिडीओ क्लीप देखील उत्कंठावर्धक आहे. ती पाहताना पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय अन् धडधड वाढल्याशिवाय राहात नाही.
पाहा व्हिडीओ-
Test cricket at its best.
Our camera was there to capture all the emotion as India pulled off a victory for the ages at the Gabba #AUSvIND pic.twitter.com/V3QchmOklA
— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2021
थोडक्यात बातम्या-
ऑस्ट्रेलियन कोचनं भारतीयांबद्दल एक वाक्य असं वापरलं, ज्यामुळे त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल
“शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाल्यास तोही नेतृत्व सिद्ध करतोच”
“संघ एका रात्रीत उभा राहिलेला नाही, हे विराट कोहलीच्या मेहनतीचं फळ”
“मुंबईतील नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या”
‘सॉरी पप्पा, मला जगण्याचा अधिकार नाही’; फेसबुक पोस्ट करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न