भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारा माणूस… राहुल द्रविड!!!

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाने 19 वर्षाखालील विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. चौथ्यांदा ही ट्रॉफी उंचावण्याचा मान भारताला मिळालाय. भारताच्या या विजयामागे प्रशिक्षक राहुल द्रविडचं मोलाचं योगदान आहे.

बीसीसीआयनं राहुल द्रविडची 19 वर्षाखालील क्रिकेट संघासाठी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची निवड केली. तेव्हापासून राहुल द्रविड या मुलांवर परिश्रम घेत आहे. या परिश्रमाचा आनंद आज समस्त भारतीय चाखत आहेत. 

दरम्यान, मॅच प्रेझेंटेशन दरम्यान जेव्हा राहुल द्रविडने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा भारतीय संघाने एकच कल्ला केला. राहुल द्रविडप्रती असलेलं त्यांचं प्रेम यावेळी अधोरेखित झालं. बीसीसीआयनं राहुल द्रविडच्या या कामाची दखल घेत त्याला 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केलीय.

दरम्यान, या मुलांना तयार करणं एवढं सोपं नसतं. अनेक अडचणी येतात, त्यामुळे या संघाच्या विजयात कर्णधारासह प्रशिक्षकाचा मोठा वाटा असतो, असं भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं म्हटलंय.