भारताच्या चिल्यापिल्यांचाही नादखुळा! विश्वचषक मारला!!!

माऊंट मॉन्गानुई ( न्यूझीलंड ) | टीम इंडियाने 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. कर्णधार पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारतापुढे 217 धावांचा आव्हान दिलं होतं. पृथ्वी शॉ 29 धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या शुभम गिलने वेगवान सुरुवात केली, मात्र 31 धावांवर तो बाद झाला. दुसऱ्या बाजूने मनजोत कारलानं विकेट टिकवून ठेवली, त्यानं फक्त शतकच केलं नाही तर भारतासाठी विजयही खेचून आणला. 

मनजोत कालरा फायनलचा हिरो ठरला, त्याने 102 चेंडूंचा सामना करत 101 धावा केल्या.  दरम्यान, 19 वर्षाखालील विश्वचषक सर्वाधिक 4 वेळा भारताने जिंकला आहे.