भारत-पाकमध्ये रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना

लंडन | उपांत्य सामन्यात भारताने बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव केला. बांगलादेशनं दिलेलं २६५ धावांचं आव्हान अवघ्या ४०.१ षटकांमध्ये पार केलं. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. धवन ४६ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या कोहलीच्या साथीने रोहित शर्माने भारताला विजय मिळवून दिला. रोहितने १२९ चेंडूत १२३ धावा केल्या, तर कोहलीने ७८ चेंडूत ९६ धावा केल्या.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या