भारताचा श्रीलंकेवर ३०४ धावांनी दणदणीत विजय

कोलंबो | श्रीलंकेचा दुसरा डाव २४५ धावात गुंडाळून भारतीय संघाने ३०४ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावात भारतीय संघानं ६०० डावांचा डोंगर उभारला होता. त्यापुढे श्रीलंकेचा पहिला डाव २९१ धावांमध्ये आटोपला. भारतानं आपला दुसरा डाव २४० धावांवर घोषीत केला.

भारताने श्रीलंकेपुढे विजयासाठी ५५० धावांचं लक्ष्य होतं. मात्र श्रीलंकेचा दुसरा डावही ढेपाळला. दुसऱ्या डावात श्रीलंकेला २४५ धावा करता आल्या.