धोनीला सूर गवसला, वेस्ट इंडिजचा दारुण पराभव

Photo- AFP

नॉर्थ साऊंड | तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ९३ धावांनी पराभव केला. या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत भारतानं २-० अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २५२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वेस्ट इंडिचा संपूर्ण संघ १५८ धावांवर गारद झाला. 

दरम्यान, भारताकडून धोनीनं नाबाद ७८ तर रहाणेनं ७२ धावा केल्या. कुलदिप यादव आणि अश्विननं प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या