ind women - भारतीय महिलांकडून न्यूझीलंडचा धुव्वा, सेमी फायनलमध्ये धडक
- खेळ

भारतीय महिलांकडून न्यूझीलंडचा धुव्वा, सेमी फायनलमध्ये धडक

डर्बी | भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडच्या महिला संघाचा १८६ धावांनी धुव्वा उडवला. संपूर्ण न्यूझीलंडचा संघ ७९ धावांत तंबूत पाठवत भारतीय महिलांनी झोकात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मिताली राजच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने न्यूझीलंडपुढे २६६ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजेश्वरी गायकवाडच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा संघ ७९ धावांत तंबूत परतला. राजेश्वरीने ५ जणींना माघारी धाडलं.

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडचं आव्हान असेल.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा