नदीजोड प्रकल्पाचा बोगदा कोसळला, 9 कामगार जागीच ठार

पुणे | नीरा आणि भीमा नदीजोड प्रकल्पासाठी खोदण्यात आलेला बोगदा कोसळून 9 कामगार ठार झालेत. इंदापूरच्या अकोलेमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

वायररोप तुटल्यामुळे अपूर्णावस्थेत असलेला बोगदा कोसळला. त्यासोबत क्रेनमध्ये असलेले मजूर खाली कोसळले. यावेळी 9 कामगार जागीच ठार झाले असून आणखी 7 कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. 

दरम्यान, अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य करण्याचं काम सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप काही मजूर अडकले असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.