इंदापूरमध्ये तिसऱ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन; नवोदितांसाठी सुवर्णसंधी

इंदापूरमध्ये तिसऱ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन; नवोदितांसाठी सुवर्णसंधी

पुणे | नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘ग्रीन वूड क्रिएशन’तर्फे तिसऱ्या इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. इंदापूरच्या केशर टॉकीजमध्ये हा फिल्म फेस्टिवल पार पडणार आहे.

प्रथम उत्कृष्ट शॉर्ट फिल्मसाठी 15 हजार रूपये-स्मृतिचिन्ह, द्वितीय उत्कृष्ट शॉर्ट फिल्मसाठी 10 हजार रूपये-स्मृतिचिन्ह, तृतीय उत्कृष्ट शॉर्ट फिल्मसाठी 7 हजार रूपये-स्मृतिचिन्ह अशी बक्षिसं दिली जाणार आहेत. यासह उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, संकलन, संगीत, अभिनय, पटकथा, बेस्ट ज्युरी अशा विविध गटात बक्षिसं दिली जाणार आहेत.

दरम्यान, या फेस्टिवलच्या माध्यमातून शहरी कलाकारांप्रमाणे ग्रामीण भागातील नवनवे चेहरे आणि ठसकेबाज विषय पहायला मिळतील, असं फेस्टिवल आयोजक-दिग्दर्शक सोमनाथ जगताप यांनी म्हटलं आहे.

फेस्टिवलचे ज्युरी सदस्य म्हणून चंद्रशेखर जोशी आणि विजयालक्ष्मी जाधव काम पाहणार आहेत. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 जानेवारीपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी 9975795544 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! हुंड्यासाठी डाॅक्टर पतीने महिलेच्या शरीरात सोडले एचआयव्हीचे विषाणू

-सरकारने दिलेलं मराठा आरक्षण कोर्टात टिकणं अवघड!

-सिनेमाच्या सेटवर लागली मोठी आग, शाहरुख खान थोडक्यात बचावला

-“भगवान हनुमान दलित नसून आदिवासी होते”

-‘त्यांच्या’ बलिदानाचं स्मरण; मराठा क्रांती मोर्चाचा ‘जल्लोष’ न करण्याचा निर्णय!

Google+ Linkedin