बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील शिक्षकांचे वाढीव पदांच्या मंजुरीसाठी बेमुदत उपोषण

मुंबई | राज्यातील अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदावरील शिक्षक दि. 2 सप्टेंबर पासून आपल्या मागण्यांसाठी शिक्षण आयुक्तालय, पुणे येथे कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. दि. 2 सप्टेंबर पासून वाढीव पदांच्या मंजुरीसाठी शिक्षण आयुक्तालय, पुणे या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.

दि.5 सप्टेंबर शिक्षक दिनी शिक्षक भगिनींनी केलेल्या भीक मांगो व मुंडन आंदोलनाची मंत्रालय स्तरावर गांभीर्याने दखल घेतली गेली आहे. आंदोलनासाठी लातूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या विभागातून शिक्षक उपस्थित रहात आहेत.

या आंदोलनाची दखल घेऊन शिक्षक व पदवीधर आमदार श्री बाळाराम पाटीलसर, श्री सुधीर तांबेसाहेब, श्री श्रीकांत देशपांडेसाहेब, श्री किशोर दराडेसाहेब, आमदार विक्रम काळेसाहेब, जयंत आसगावकर सर, आमदार अभिजित वंजारीसाहेब, आमदार किरण सरनाईकसाहेब, मा. आ. दत्तात्रय सावंत सर हे सर्व मान्यवर मंगळवार दि. 14 सप्टेंबर रोजी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.

वाढीव पदावरील हे शिक्षक गेली 17 ते 18 वर्ष अनुदानित महाविद्यालयात पूर्णवेळ व अर्धवेळ विनावेतन काम करत आहेत. शासन वाढीव पदावरील शिक्षकांची माहिती वारंवार मागवून वेळकाडूपणा करीत असल्यानं या शिक्षकांची सहनशीलता संपली आहे. या शिक्षकांची परिपूर्ण माहिती शिक्षण आयुक्तांनी त्वरीत मुंबईला पाठवावी व नियुक्ती दिनांकापासून आर्थिक तरतूदीसह मान्यता मिळावी या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र  आंदोलन केले जाईल अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद कृती समितीचे अध्यक्ष श्री सचिन चव्हाण यांनी दिली.

थोडक्यात बातम्या –  

हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ भागात अलर्ट जारी!

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

रणवीर-दीपिका झाले गुंठामंत्री! मुंबईमध्ये खरेदी केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची जमीन

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’”

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पंजाबला त्रास देऊ नये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More