बांग्लादेशातील हिंदुंबद्दल नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Independence Day 2024 | आज देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. भारत आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी बोलताना बांग्लादेशातील परिस्थितीवर देखील मोदींनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी  बांग्लादेशातील हिंदुंबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

बांग्लादेशात जे काही झालय. त्याबद्दल चिंता आहे. मी आशा करतो, तिथे परिस्थिती सामान्य होईल. खासकरुन 140 कोटी देशवासियांना चिंता आहे. बांग्लादेशात हिंदू, अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे, असं मोदी म्हणाले.

शेजारी देशात सुख, शांती नांदावी हीच नेहमी भारताची भूमिका राहिली आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे तसे संस्कार आहोत. बांग्लादेशाच्या विकास यात्रेत आमच शुभचिंतन राहील, असं पीएम मोदी म्हणाले.

Independence Day 2024 | “हा आपला सुवर्णकाळ आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग 11 व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा (Independence Day 2024) फडकावला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत. हा आपला सुवर्णकाळ आहे, माझ्या प्रिय देशवासियांनो ही संधी जाऊ देऊ नका असं आवाहान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘आमचा बुद्धांचा देश आहे, युद्ध हा आमचा मार्ग नाही. 2047 पर्यंत भारताला विकसीत करण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं मोदींनी म्हटलं आहे.

देशातील लाखो लोकांनी विकसीत भारताविषयीचं काय स्वप्न आहे, त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. मला हे सांगताना आनंद होत आहे की, विकसीत भारतासाठी कोट्यवधी देशवासीयांनी सूचना केल्या. त्यांची अमूल्य मते मांडली. आपल्या देशातील जनतेची विचार शक्ती मोठी आहे. त्यांची स्वप्न मोठी आहेत, असं पंतप्रधान म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! सोन्याचे भाव उतरले, जाणून घ्या किमती

“अगोदर दहशतवादी हल्ले करून निघून जायचे, आता थेट सर्जिकल स्ट्राईक होतो”

लाल किल्ल्यावरून PM मोदींची देशभरातील युवकांसाठी मोठी घोषणा; म्हणाले..

“स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचं रक्त आपल्या नसांमध्ये..”; PM मोदींचं देशवासीयांना मोठं आवाहन

लाडक्या बहीणींनो, योजनेचा पहिला हप्ता आला; खात्यात 3000 आले की नाही असं चेक करा