स्वातंत्र्यदिनी ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट पाहून आजचा खास दिवस करा साजरा!

Independence Day l आपण यंदाच्या वर्षी 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. 2024 च्या स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष प्रसंगी, दरवर्षी एक विशेष थीम निश्चित केली जाते आणि यावेळी ‘विकसित भारत’ ही थीम आहे. देशप्रेमाची भावना केवळ देशातच नाही तर चित्रपटसृष्टीतही दिसून येते. तर आज आपण असे 5 चित्रपट जाणून घेणार आहोत जे की आपल्याला आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पाहता येतील.

देशभक्तीवर आधारित हे चित्रपट नक्की पाहा :

साऊथ सुपरस्टार सूर्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजेच ‘जय भीम’ 2021 साली रिलीज झाला होता. देशभक्तीवर आधारित चित्रपटांच्या या यादीत या चित्रपटाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. कारण हा चित्रपट जातीसारख्या गहन सामाजिक समस्येवर प्रकाश टाकतो. त्यामुळे स्वातंत्रदिनी ‘जय भीम’ सारखा चित्रपट नक्की पाहायला हवा. चित्रपटामध्ये संपूर्ण समाज आजही आपली ओळख, स्थान आणि मूलभूत गरजांसाठी कसा संघर्ष करतो हे दाखवले आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

प्रेक्षकांना आपल्या देशाबद्दल आणि समाजाबद्दल खोलवर विचार करायला भाग पाडणारा ‘जन गण मन’ हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला आहे. पृथ्वीराज सुकुमारन यांचा हा मल्याळम चित्रपट खूप हिट ठरला आणि त्याचे खूप कौतुक झाले. हा एक सोशल ड्रामा चित्रपट आहे, जो तुम्हाला आतून हादरवून टाकतो. हा चित्रपट न्यायालयीन खटल्यावर आधारित असून अलीकडच्या राजकीय परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Independence Day l प्रेम आणि देश यांच्यातील युद्ध ‘सीता राम’ चित्रपट पाहा :

देशभक्तीवर आधारित ‘सीता राम’ चित्रपट देखील 2022 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रेम आणि देश यांच्यातील युद्ध अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आले आहे, जे नेहमीच आव्हानांनी भरलेले असते. भारतीय सैनिकासाठी प्रेमापेक्षा देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची असते, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

मात्र, ही एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात रामचे देश आणि कर्तव्यावरील प्रेमही अधोरेखित करण्यात आले आहे. साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमानने लेफ्टनंट रामची भूमिका साकारली आहे. हनु राघवपुडी दिग्दर्शित हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

News Title- Independence Day 2024 Celebrate With Patriotic Movies

महत्वाच्या बातम्या-

स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! सोन्याचे भाव उतरले, जाणून घ्या किमती

“अगोदर दहशतवादी हल्ले करून निघून जायचे, आता थेट सर्जिकल स्ट्राईक होतो”

लाल किल्ल्यावरून PM मोदींची देशभरातील युवकांसाठी मोठी घोषणा; म्हणाले..

“स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचं रक्त आपल्या नसांमध्ये..”; PM मोदींचं देशवासीयांना मोठं आवाहन

लाडक्या बहीणींनो, योजनेचा पहिला हप्ता आला; खात्यात 3000 आले की नाही असं चेक करा