“प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक कोटी रूपये, हेलीकाॅप्टर देणार आणि चंद्रावरही नेणार”
चेन्नई | येत्या 6 एप्रिलला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी चेन्नई मधील अनेक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. तसेच काहींनी त्यांचा जाहीरनामा जाहीर केला आहे. यादरम्यान एका अपक्ष उमेदवाराने दिलेल्या अश्वासनामुळे हा उमेदवार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
थुलम सरवनन असं या उमेदवारचं नाव असून त्यांनी दिलेल्या आश्वासनाने मतदारांना आकाशात नेऊन ठेवलं आहे. थुलम सरवनन मदुराई विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत. या जागेवर एकूण 13 उमेदवार उभे आहेत. मात्र थुलम यांचा प्रचार जोरदार नाही तर अतिशय खतरनाक रित्या चालू आहे असं म्हणायला हकरत नाही. थुलम सरवनन यांनी दिलेल्या अश्वासनांनुसार त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक घराला एक मिनी हेलिकाॅप्टर आणि आयफोन देण्यात येणार आहे.
मतदार संघातील मतदारांना प्रत्येक वर्षी एक कोटी रुपये आणि चंद्रावर नेण्याचं अश्वासन थुलम यांनी दिलं आहे. एवढचं नाही तर घरकाम करणाऱ्या महिलांचा कामाचा त्रास कमी होण्यासाठी त्यांना रोबोट तर मतदारसंघात गारवा निर्माण करण्यासाठी 300 फुट उंच कृत्रिम डोंगर उभरण्याचं अश्वासनही थुलम यांनी दिलं आहे.
दरम्यान, थुलम सरवनन यांचं निवडणूक चिन्ह कचरा पेटी असून उमेदवारी अर्ज भरण्यासठी त्यांनी 20 हजार रुपये व्याजावर घेतले असल्याची माहिती आहे.
थोडक्यात बातम्या-
” भाजपमध्ये दलितांना किंमत नाही, राष्ट्रपतींनी नमस्कार केला तर मोदी त्यांची दखल घेत नाही”
धक्कादायक! फुलांसारख्या दोन लेकींसह बापाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण!
“नाव परमविरांसारखं आणखी अन संपत्ती हडपतो बकासुरासारखी”
संजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.